सांगलीची लोखंडी पिंजरा कुस्ती किरण भगतने जिंकली ! मनजितला दाखवलं अस्मान..
सांगलीत डॉ. बाबासाहेब आंबेडकर स्टेडियमवर लोखंडी पिंजऱ्यात रंगलेल्या ऐतिहासिक कुस्तीमध्ये उपमहाराष्ट्र केसरी किरण भगतने डब्ल्यूडब्ल्यूई पैलवान मनजीतसिंगला चितपट केलंय. लोखंडी पिंजऱ्यातील या पोलादी कुस्तीमध्ये किरणने अवघ्या काही मिनिटात मनजितसिंगवर मात केली.
18 जानेवारी, सांगली : डॉ. बाबासाहेब आंबेडकर स्टेडियमवर लोखंडी पिंजऱ्यात रंगलेल्या ऐतिहासिक कुस्तीमध्ये उपमहाराष्ट्र केसरी किरण भगतने डब्ल्यूडब्ल्यूई पैलवान मनजीतसिंगला चितपट केलंय. लोखंडी पिंजऱ्यातील या पोलादी कुस्तीमध्ये किरणने अवघ्या काही मिनिटात मनजितसिंगवर मात केली.
तब्बल 70 वर्षांनंतर ही महाराष्ट्रात पहिल्यांदाच अशा पद्धतीची कुस्ती खेळली गेली. महाराष्ट्र केसरीचा उपविजेता किरण भगत या 105 किलो वजनाच्या मराठमोळ्या पैलवानाने 140 किलो वजनाच्या मनजित सिंग केवळ चपळाईच्या जोरावर अस्मान दाखवलं. विशेष म्हणजे हा मनजित सिंग बेल्जियममध्ये WWEचं प्रशिक्षण घेतो तर किरण भगत हा पुण्याचे पैलवान काका पवारांच्या तालमीत तयार झालाय.
या कुस्ती सोहळ्यासाठी तुझ्यात जीव रंगला फेम राणादा हार्दिक जोशी प्रमुख पाहुणा म्हणून उपस्थित होता. या बंद पिंजरा कुस्ती प्रकारात विजेत्या पैलवानाने प्रतिस्पर्ध्याला आस्मान दाखवल्यानंतरच लोखंडी पिंजऱ्याचं कुलूप उघडून मैदानावर यायचे असते. त्याप्रमाणेच सामना संपल्यावर किरण भगत कुलूप उघडून पिंजऱ्याबाहेर आला. ही कुस्ती पाहण्यासाठी पंचकृषीतले कुस्तीप्रेमी मोठ्या प्रमाणावर आले होते.
Post Comment
कोई टिप्पणी नहीं
अगर आपको आर्टिकल पसंद आया हो और आपका कोई सवाल हो तो आप नीचे कमेंट करके पूछ सकते हैं।इसी तरह के आर्टिकल पढ़ने के लिए ऊपर फॉलो का बटन दबाएँ।इस आर्टिकल को शेयर करें ताकि ज़्यादा से ज्यादा लोग इसके बारे में जान सकें।अगर मुझे समय मिला तो मैं आपके कॉमेंट्स का रिप्लाई ज़रूर करूँगा।आर्टिकल पड़ने का धन्यवाद।